जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील वावडदा केंद्रातील वडली येथील जिल्हा परिषद प्राथमिक विदया मंदिर शाळेत आज भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंतीनिमित्त “वाचन प्रेरणा दिन “म्हणून साजरा करण्यात आला.
वाचन हे प्रगतीचे लक्षण व सर्वांगीण विकासाचा पाया समजला जातो. जरी कोविड-१९मुळे शाळा बंद असल्या तरी विद्यार्थाच्या शालेय जीवनात खंड पडू नये, त्यांच्यावर चांगले वाचनसंस्कार व्हावे, विचार क्षमता, त्यांच्या ठायी वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी वडली येथील उपशिक्षिका सौ. मोनिका चौधरी यांनी प्रत्यक्ष विद्यार्थाच्या घरी जाऊन त्यांचे वाचन करून घेतले वाचनाचे महत्त्व सांगून पालकांनी विदयार्थाचे दररोज वाचन घेत राहावे तसेच अभ्यासाचे महत्व सांगितले. सौ. मोनिका चौधरी यiच्या अशा विविध उपक्रमांची दखल जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने घेतली असून “आपला जिल्हा आपले उपक्रम “या नाविन्य पूर्ण पुस्तकातही त्यांच्या उपक्रमांना स्थान दिले आहे. तसेच संस्कार भारती जळगाव मातृ विभाग आयोजित संत नामदेव व सावता माळी यांच्या पुण्यतिथी निमित्त “राज्यस्तरीय काव्य स्पर्धत “प्रथम क्रमांकाचे बक्षिस प्रमाणपत्र त्यांनी पटकावले आहे. त्यांच्या कार्यांचे गट शिक्षणाधिकारी सतीश चौधरी, शिक्षण विस्तार अधिकारी रविकिरण बिऱ्हाडे, केंद्र प्रमुख कैलास तायडे, मुख्याध्यापक नितीन धांडे तसेच सर्व शिक्षकवृंद व पालकांकडून सर्वत्र कौतुक होत आहे.