मुख्यमंत्र्यांची अवस्था ‘गजनी’ सारखी : अनिल बोंडेंचा घणाघात

उस्मानाबाद । मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची अवस्था ‘गजनी’तल्या पात्रासारखी झाली असून स्मरणशक्ती वाढविण्यासाठी त्यांना आयुष मंत्रालयाने च्यवनप्राश व आयुर्वेदीक औषध पाठवावे अशी घणाघाती टीका माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी आज केली आहे.

मुख्यमंत्री नसताना उद्धव ठाकरे यांनी कोराडवाहूला २५ हजार आणि बागायतीला हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई देऊ अशी मागणी केली होती, याचा त्यांना विसर पडला.  सरकारने पंचनामे करण्यापेक्षा सरसकट शेतकर्‍यांना मदत करावी. सरकार मुर्दाड झालं आहे. सरकारने कर्ज काढावे, स्वतः गहाण राहावं, पण शेतकर्‍यांना मदत करावी अशी मागणी अनिल बोंडे यांनी केली. मुख्यमंत्री व सत्ताधारी मंत्री शेतकर्‍यांच्या बांधावर अद्याप आलेले नाहीत. कारण सगळे जण आपल्या कुटुंबासोबत आहेत. माझे कुटुंब माझी जबाबदारी हेच त्यांच्यासाठी मोठं आहे. शेतकर्‍याच्या कुटुंबाची त्यांना काळजी नाही. उद्धव ठाकरे यांनी मंत्री व आमदारांना आपल्या कुटुंबासोबत राहावं आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळा असे आदेश दिले आहेत. शेतकरी यांना माफ करणार नाहीत, फटके मारतील अशी टीकाही अनिल बोंडेंनी केली.

Protected Content