पाचोरा, प्रतिनिधी । तालुक्यातील वडगाव येथील ग्रामपंचायतीच्या ७ जागांपैकी चार जागा बिनविरोध निवडूण आल्या आहे. निवडून आलेल्या सर्व सदस्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.
पाचोरा तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतीच्या निवडणूकांसाठी १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान होणार असुन ४ जानेवारी २०२१ ही माघारीची तारिख होती. या संधीच सोन करत आपसातील मतभेद विसरून गावविकासाचे एकमेव धोरण डोळ्यासमोर ठेवून वडगांव कडे ता. पाचोरा या ग्रामपंचायतीतील सात सदस्य संख्या असुन यातील वार्ड क्रं. १ मधुन विकास गोपाळ पाटील, वार्ड क्रं. २ मधुन मच्छिंद्र श्रावण तडवी, रमाबाई वसंत शेजूळ, वार्ड क्रं. ३ मधुन लता मधुकर पाटील हे सदस्य बिनविरोध झाले आहेत. या चार जागा बिनविरोध करण्यासाठी ग्रामस्थांनी प्रयत्न केले आहे. वरील सर्व सदस्यांची एकमताने बिनविरोध निवड झाली आहे. सर्व सदस्यांचे ग्रामस्थांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.