लोकांनी नियम पाळले नाहीतर लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही — आरोग्यमंत्री राजेश टोपे

 

मुंबई:  वृत्तसंस्था । महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर  आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये बैठक पार पडली. लोकांनी कोरोना विषयक नियम पाळले नाहीतर लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही, असं वक्तव्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.

 

कोरोना रुग्णसंख्या वाढत राहणं म्हणजे आपण लॉकडाऊनच्या दिशेने जात आहोत, असं राजेश टोपे म्हणाले. कोरोना रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी राज्यातील निर्बंध आणखी कडक करण्यात येणार आहेत, अशी माहिती देखील राजेश टोपे यांनी दिली.

 

 

महाराष्ट्रात काही दिवसांपासून 30 हजारांहून अधिक कोरोना रुग्ण दररोज वाढत आहेत. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यात  बैठक झाली झाली. दररोज 10 टक्के रूग्णसंख्येत वाढ होतेय. दोन -तीन दिवस आणखी आढावा घेतला जाणार आहे.

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जनतेला आवाहन करुनही प्रतिसाद मिळत नसेल तर राज्य सरकारला कठोर निर्णय घ्यावा लागेल, असं वक्तव्य पवार यांनी केले. आपापली जबाबदारी लक्षात घेवून नियमांचे उल्लंघन न करता होळी साजरी करा.सध्याची परिस्थिती पाहता शांतपणे होळी साजरी करा. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेतील कोरोना रुग्णसंख्या अधिक आहे. सध्या कुटुंबच्या कुटुंब कोरोनाबाधित आढळत आहेत ही चिंतेची बाब आहे. प्रत्येकानं नियमांचे पालन केलं पाहिजे. प्रशासन प्रयत्न करतंय, त्यामध्ये जनतेनेही मनावर घेतलं पाहिजे, अशी अपेक्षा अजित पवार यांनी केली.

Protected Content