लॉकडाऊन घोषीत केलेल्या शहरात पोलीस अधिक्षकांकडून बंदोबस्ताची पडताळणी

जळगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील जळगाव शहर, भुसावळ तसेच अमळनेर येथे पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे. या बंदोबस्ताची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून पडताळणी करण्यात येत आहे. दरम्यान पोलीस कर्मचारी आपले कर्तव्य व्यवस्थित करीत आहे की नाही यासाठी साध्या वेशात पोलीस कर्मचाऱ्यांना पाठविण्यात आले आहे.

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जळगाव जिल्हयातील जळगांव शहर महानगर पालीका क्षेत्र , भुसावळ नगरपालीका क्षेत्र व अमळनेर नगरपालीका क्षेत्रात ७ ते १३ जुलैपर्यंतम लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे़ त्यामुळे या तिन्ही ठिकाणी पोलिसांना बंदोबसत लावण्यात आलेला आहे. तर प्रत्येक पॉर्इंटवर ये-जा करणाºया नागरिकांची चौकशी करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत़ सूचनेप्रमाणे कर्मचारी बंदोबस्त करीत आहेत किंवा नाहीत याबाबत पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले हे स्वत: आढावा घेत आहेत़ तसेच विवीध ठिकाणी वेषांतर केलेले पोलीस कर्मचारी त्यांनी पाठविले आहे़ ज्या-ज्या ठिकाणी पोलीस बंदोबस्ताचे पॉर्इंट लावण्यात आलेले आहेत तेथे जर नेमलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी हे कर्तव्यात कसुर करतील त्यांचेवर कठोर कारवाई करण्यात येईल, असाही इशारा पोलीस अधीक्षकांनी दिला आहे़ कोरोनाचा संसर्ग वाढला असून नागरिकांनी अत्यावश्यक असल्यावरचं घराबाहेर निघावे, असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले आहे़ तसेच विनाकारण बाहेर फिरणाऱ्‍यांवर कारवाई करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

Protected Content