लॉकडाऊनमुळे विड्याच्या पानाची शेती संकटात; शासनाकडून मदतीची मागणी

भुसावळ प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात विड्याच्या पानांची शेती अनेक ठिकाणी केली जाते. बारी समाज हा पिढ्यानपिढ्या विड्याच्या पानांची शेती करत आलाय. मात्र लॉकडाऊनमुळे काढणीला आलेले विड्याच्या पानांचे पीक वाळून जात असल्याने विड्याचे पाने उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशभरात लावून असल्याने याचा परिणाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात होत असून पिढ्यानपिढ्या पारंपारिक विड्याच्या पानांची शेती करणारे बारी समाजातील शेतकरी लोक काढणीला आलेले पीक सुकत असल्याने संकटात सापडले आहे. जळगाव जिल्ह्यात अनेक विड्याच्या पानांची शेती मुळे असून बारी समाजातील ८० टक्के शेतकरी विड्याच्या पानाची पारंपारिक शेती करतात. विड्याच्या पानाचा उपयोग खाण्या सोबतच धार्मिक विधींमध्ये ही मोठ्या प्रमाणात होतो. मात्र लॉडाऊनमुळे पानांची दुकाने व धार्मिक विधी बंद असल्याने विड्याच्या पानांची मागणी थांबली आहे.

शासनाकडून मदतीची मागणी
श्रावण महिन्यात म्हणजेच जुलै-ऑगस्टच्या दरम्यान विड्याच्या पानाची लागवड केली जाते. तर मार्च एप्रिल दरम्यान विड्याच्या पानांची काढणी होते. मात्र लॉकडाऊनमुळे विड्याच्या पानाची मागणी थांबल्याने काढणीला आलेले विड्याच्या पानाचे पीक सुकत असून लागवडीला आलेला लाखो रुपयांचा खर्च बुडत असल्याने संकटात सापडलेला पान उत्पादक शेतकरी शासनाकडून मदतीची मागणी करत आहे.

Protected Content