भुसावळात विवाहितेला धमकी देत अत्याचार; संशयिताला अटक

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील एका भागात राहणाऱ्या तीस वर्षीय विवाहितेला मुलाचे अपहरण व पतीला जीवेठार मारण्याची धमकी देत जबरदस्तीने अत्याचार केल्याची घटना उघडकीला आले आहे. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे

भुसावळ बाजार पेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरात एका भागात राहणाऱ्या ३० वर्षीय विवाहिता आपल्या पती व मुलासह राहते. गेल्यावर्षी २०२० च्या रमजान महिन्यापासून ते सप्टेंबर २०२१ महिन्यापर्यंत संशयित आरोपी शेख जमशेद शेख शमीम उर्फ जम्मू ई याने विवाहितेला तिच्या मुलाच्या अपहरणाची धमकी व पतीला जिवेठार मारण्याची धमकी देऊन जबरदस्ती दबाव आणून इच्छेविरुद्ध अत्याचार केले. दरम्यान मुलाच्या अपहरणाची धमकी व पतीस जिवे ठार मारण्याची धमकी दिली असल्याने तिने घाबरून त्यावेळी तक्रार केली नाही. परंतु तिच्या पतीने मनातील भीती दूर करून  केल्याने विवाहितेच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी शेख जमशेद शेख शमीम याच्यावर भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा झाल्यानंतर संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शांताराम महाजन करीत आहे.

Protected Content