लॉकडाऊनमुळे उपासमार : रावेरच्या तरूणाची नाशिकमध्ये आत्महत्या !

नाशिक प्रतिनिधी । लॉकडाऊनमुळे खाण्यास अन्न मिळत नसल्याने नैराश्यग्रस्त झालेल्या रावेरच्या रूपेश भरत पाटील या विद्यार्थ्याने नाशिक येथील आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबात माहिती अशी की, मूळचा रावेर येथील रहिवासी असणारा रूपेश भरत पाटील ( वय२२) हा विद्यार्थी आपल्या भावासह नाशिक येथे शिक्षण घेत होता. लॉकडाऊन झाल्यामुळे तो आपल्या भावासह नाशिकलाच अडकून पडला होता. त्याला काही दिवस भोजन मिळाले. तरी नंतर मात्र भोजन मिळण्यात अडचणी आल्याने तो तणावात होता. या दोन्ही भावंडांनी आपल्या कुटुंबियांना याची माहिती दिली. त्यांच्या वडिलांनी जळगावच्या जिल्हाधिकार्‍यांना याबाबत माहिती देऊन आपल्या मुलांना परत रावेर येथे आणण्यासाठी परवानगी मागितली. मात्र त्यांना ही परवानगी मिळाली नाही.

दरम्यान, रूपेश आणि त्याचा भाऊची उपासमार होऊ लागली. यामुळे नैराश्यग्रस्त झालेल्या रूपेश भरत पाटील याने आज सातपुर येथील गुलमोहर कॉलनीत राहत असलेल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

Protected Content