लॉकडाउनचा कालावधी वाढवल्याचा फायदा झाला : नरेंद्र मोदी

मुंबई (वृत्तसंस्था) नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी कोरोनामुळे देशात निर्माण झालेल्या परिस्थितीवर सोमवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.

 

नरेंद्र मोदींनी लॉकडाउनसंबंधी पुढील धोरण ठरवण्यासाठी बोलावण्यात आलेल्या या बैठकीत बोलताना म्हटले की, १४ एप्रिल रोजी लॉकडाउनची मुदत संपल्यानंतर केंद्र सरकारने त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना याची घोषणा केली होती. लॉकडाउनचा दुसरा टप्पा ३ मे रोजी संपत आहे. तर करोनाग्रस्त रुग्णांचा आकडाही वाढत आहे. दुसरीकडे आर्थिक संकटही डोके वर काढायला लागले असून, ३ मे नंतर काय होणार? याकडे देशवासियांचे लक्ष लागले आहे. बैठकीदरम्यान नऊ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आपलं म्हणणं मांडत राज्यातील परिस्थितीची माहिती दिली. बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहदेखील सहभागी झाले होते.

Protected Content