लेवा पाटीदार युवक महासंघातर्फे कुटुंबनायकांचा सत्कार

 

भुसावळ प्रतिनिधी । अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघ तर्फे भोरगाव लेवा पंचायतीचे कुटुंबनायक रमेश विठू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हृद्य सत्कार करण्यात आला.

अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघ तर्फे भोरगाव लेवा पंचायत कुटुंबनायक रमेश विठू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संघटनेचे केंद्रीय उपाध्यक्ष राजेश सुधाकर पाटील,शहर अध्यक्ष देवेंद्र वाणी, जिल्हा उपाध्यक्ष श्याम भारंबे, प्रदेश संघटक रुपेश चौधरी, प्रवीण पाटील,शुभम पाटील आदींची उपस्थिती होती.

संघटनेतर्फे रमेश विठू पाटील यांचे अभिष्टचिंतन करून त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Protected Content