उद्यापासून कमांडो ट्रेनिंग कॅम्पचे आयोजन

शेंदुर्णी, प्रतिनिधी | येथील छत्रपती शिवाजी क्रीडा व सांस्कृतिक मंडळ व जळगाव जिल्हा तायक्वोंदो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नवतरुण व होतकरु मुलांसाठी पाच दिवशीय  कमांडो ट्रेनिंग कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.

 

 

आजच्या तरुणांमध्ये व्यायामाची आवड कमी होत आहे. तसेच आजकाल धावपळीच्या जीवनात आत्मरक्षणासाठी तसेच विविध ठिकाणी भरतीसाठी कराटे सारखी विद्या गरजेची असल्याने तरुण मुलांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण कमी होऊन व्यायामाची आवड लागून प्रकृती व आरोग्य सुदृढ राहण्यासाठी या कॅम्पचे आयोजनामागची मुख्य भूमिका आहे. संस्थेतर्फे घेतला जाणारा हा २१ वा कॅंप असुन १९९४ पासुन या ठिकाणी कॅंपचे आयोजन केले जात आहे. हा कमांडो ट्रेनिंग कॅम्प शुक्रवार दि. १९ ते मंगळवार २३ नोव्हेंबर या कालावधीत पाच दिवसासाठी आयोजित करण्यात आला आहे. या ट्रेनिंग कॅम्पमध्ये मुख्य प्रशिक्षक म्हणून सेन्साई ब्लॅक बेल्ट थर्ड डॅन श्रीकृष्णा चौधरी , महिला प्रशिक्षकनॅशनल गोल्ड मेडलिस्ट लोचना चौधरी तसेच सह प्रशिक्षक म्हणून सोयगावचे करीम देशमुख, पहूरचे हरिभाऊ राऊतहे असणार आहेत. मुख्य मार्गदर्शक म्हणून जळगाव तायक्वोंदो असोसिएशनचे अजित घारगे हे असणार आहेत.
हा कमांडो ट्रेनिंग कॅम्प सोयगाव तालुक्यातील निसर्गरम्य वातावरणात असलेल्या गलवाडा धरण परिसरात होणार असून या कॅम्पमध्ये सहभागी होण्यासाठी ९६८९७९५७३३, ९४०३९८८२०२ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून वेळीच नावनोंदणी करुन घ्यावी म्हणजे प्रशिक्षणार्थी इच्छुकांची संख्या लक्षात घेऊन तशी व्यवस्था करणे सोईस्कर ठरेल. तरी इच्छुकांनी त्वरित संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Protected Content