लेले हायस्कुलच्या १९९३ सालातील १० वीच्या वर्गमित्रांचा स्नेहमेळावा

 

पहूर  ता. जामनेर : प्रतिनिधी । येथील लेले हायस्कुलच्या १९९३  सालातील १० वीच्या वर्गमित्रांचा स्नेहमेळावा  नुकताच उत्साहात संपन्न झाला

 

दिवा मातीचा की सोन्याचा हे महत्त्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे मित्र गरीब आहे का श्रीमंत आहे हे महत्त्वाचं नसून तो तुमच्या संकटात किती खंबिरपणे तुमच्या पाठीशी उभा राहतो हे महत्त्वाचं आहे , असे मैत्रीबद्दल सांगितले जाते .   १९९३ सालातील दहावीची बॅच व्हाट्सअप  ग्रुपच्या माध्यमाने आधी एकत्र येवून.नंतर हा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता .

 

बालपणीच्या सवंगड्याची ओढ मात्र वेगळीच. तो कितीही मोठा झाला, उच्चपदावर गेला तरीही तो सखाच राहतो .असेच पहूर आर टी लेले हायस्कुल मध्ये १९९३ साली इयत्ता १०वी त असलेले बालपणीचे मित्र मैत्रिणी यांनी एकत्रित येऊन स्नेहमेळाव्याचे आयोजन केले . मित्र मैत्रिणी भेटताच  त्यांनी एकमेकांची आस्थेवाईकपणे विचारपूस  केली . बालपणीचा वर्गमित्र भेटल्याचा आनंद हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.

 

ज्यांनी ज्ञानदानाचे पवित्र कार्य करीत सुसंस्कृत पीढी घडविली असे जेष्ठ गुरूजन भेटताच सर्वांनी त्यांचे आशिर्वाद घेतले. यावेळी घेण्यात आलेल्या स्नेह मेळावा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लेले हायस्कुलचे विद्यमान मुख्याध्यापक सी. टी. पाटील  होते. जुने वर्ग शिक्षक वाय. एस.पाटील  , आर .के. पाटील   , अशोक खांजोडकर  , बडगुजर  ,सुहासिनी जोशी   , विलास भालेराव   ,विजय बोरसे  , बोरसे  ,आर .बी. पाटील  , भामेरे भाऊसाहेब, किशोर पाटील व गिरीश भामेरे  यांचेसह सर्व गुरूजनांची व्यासपिठावर प्रमुख उपस्थिती होती.

 

 

प्रास्तविक  संभाजी क्षिरसागर यांनी केले. यावेळी प्रत्येकाने शाळेतल्या जुन्या आठवणी सांगत आपापली सामाजिक ,कौटुंबिक जबाबदारी सांभाळत उद्योग

,व्यवसाय , नोकरी करीत असल्याचे सांगितले .  सर्व गुरूवर्यांचा सत्कार   करण्यात आला. शाळेला सर्व विद्यार्थ्यांकडून ट्राली स्पिकर भेट म्हणून देण्यात आला. सुत्रसंचालन महेश मोरे यांनी केले  तर आभार सुरेश क्षिरसागर यांनी मानले.

 

सर्व मित्रांनी इयत्ता १०वीच्या वर्गात बसुन जुन्या आठवणी स्मरून आनंद व्यक्त केला.  नीता घोलप, पोर्णिमा लोढा ,ज्योती भामेरे ,अंजली खांजोडकर , हेमलता  टोके, भारती  भामेरे , हीरालाल बारी ,सुशील चौधरी,  दीपक  जाधव, श्रीराम रंजवे, गजानन बारी, रमेश सुरडकर , मुक्तार पठाण, कालीचरण   बिराडे, गणेश तायडे , सुधाकर वारुळे, दिलीप  भामरे , कमलेश   पाटील, भागवत  सोनवणे , सुरेश  क्षीरसागर , महेश मोरे व डॉ. संभाजी  क्षीरसागर या सर्वांची उपस्थिती होती.

Protected Content