रावेर, प्रतिनिधी । चंदन व लिंबाच्या लाकडांची तालुक्यातुन अवैधरित्या वाहतूक मध्य प्रदेशकडे होते याकडे स्थानिक वन विभागाचे व नाकेदारांचे जाणून-बुजुन दुर्लक्ष होत आहे. याची वरिष्ठ अधिका-यांनी गंभीर दखल घेऊन कर्तव्यात कसूर करणा-यांवर कारवाई करण्याची मागणी निळे निशान सामाजिक संघटनेचे आनंद बाविस्कर यांनी केले आहे.
याबाबत वृत्त असे की, मंगळवारच्या रात्री यावल वनविभागाच्या फिरत्या पथकाने रावेर तालुक्यातील खानापुर नजिक चंदनाचे लाकड व लिंबाच्या लाकडांनी भरलेला अखा ट्रक अवैधरित्या विना पास मध्य प्रदेशकडे जात होता. याची माहीती यावल वन विभागाच्या फिरत्या पथकाला मिळताच त्यांनी खानापुर येथील रावेर वन विभागाच्या चेक पोस्ट दरम्यान पकडल्याने या प्रकरणा वेगळ वळन लागले आहे. यामुळे येथील स्थानिक नाकेदारांच्या आशीर्वादामुळे तालुक्यातून अवैध लाकडांची तस्करी होते. रात्री चंदनचे लाकडे काढून देणारे तस्कर वनविभागाच्या हातून कसे निसटतात यामध्ये काही आर्थिकहित संबंध आहे का.? आतापर्यंत किती अवैध लाकडांच्या ट्रकांवर येथील स्थानिक नाकेदारांनी कार्रवाई केली आहे.असे अनेक प्रश्न यावल वन विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाई नंतर उपस्थित होत आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या तळाशी जाण्याची मागणी निळे निशान सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांनी केली आहे.