लाठी शाळेतील चोरीच्या गुन्ह्यात २ संशयित अटकेत

 

 

 

जळगाव : प्रतिनिधी । महापालिकेच्या निर्मलाबाई लाठी शाळा क्र ३८ च्या इमारतीतून झालेल्या चोरीच्या गुन्ह्यातील २ चोरटे पोलिसांच्या हाती लागले आहेत त्यांनी चोरलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे . पोलिसांनी या चोरांच्या ५ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी कोर्टाकडे केली आहे .

ढाकेवाडीतील या शाळेचे कुलूप तोडून चोरांनी ही चोरि केली होती . याच शाळेत महापालिकेचे घरपट्टी विभागाचे कार्यालय आहे ते फोडून चोरांनी सुमारे ७० हजार रुपयांचे ३ संगणक , २ प्रिंटर व अन्य साहित्य चोरले होते . या दोघांपैकी एक जण विधिसंघर्षग्रस्त बालक आणि दुसरा सराईत गुन्हेगार आहे . उर्वरित मुद्देमाल मिळवण्यासाठी , या चोरांच्या आणखी साथीदारांची माहिती मिळवण्यासाठी , त्यांनी वापरलेली मोटार सायकल कुठून आणली ते शोधण्यासाठी पोलिसांनी पोलीस कोठडीची मागणी कोर्टाकडे केली आहे .

Protected Content