जळगाव.: प्रतिनिधी । भा . द . वि . कलम ४२० नुसार दाखल गुन्ह्यात अनुकूल आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यासाठी १९ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला आज लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा रचून पकडले .
बांभोरी बुll ( ता.धरणगाव ) येथील ४८ वर्षीय तक्रारदाराने ही लाचेची मागणी होत असल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे केली होती धरणगाव पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक विलास सोनावणे ( बक्कल नं.२७८६ , रा.अमळनेर ) असे या आरोपी पोलिसांचे नाव आहे . त्याने ६ मार्चरोजी तक्रारदाराकडे या रकमेची मागणी केली होती .
तक्रारदार यांच्या विरूध्द धरणगाव पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या भादवि कलम- ४२० च्या गुन्ह्याचा तपास आलोसे यांचेकडे असुन गुन्ह्याचे अनुकूल चार्जशीट न्यायालयात पाठविण्याच्या मोबादल्यात आलोसे यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांचेकडे 19,000/- रूपयांची लाचेची मागणी केली व तक्रारदाराकडे असलेले डिव्हाइस हिसकावून नेले म्हणुन अमळनेर पोलीस स्टेशन गु.र.नं.११९/२०२१ भ्र.प्र.अ.-कलम-७ सह कलम-३९२, २०१, १८६ भादवि अन्वये आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या या सापळा पथकात उप अधीक्षक गोपाल ठाकुर, पोलीस निरीक्षक . निलेश लोधी, पोकॉ.नासिर देशमुख, पोकॉ.ईश्वर धनगर. यांचा समावेश होता नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने , अपर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे ,पोलीस उपअधीक्षक .विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा सापळा रचण्यात आला होता