नवी दिल्ली वृत्तसंस्था । केंद्र सरकारने आज बालकांना मास्कची आवश्यकता नसल्याचे नवीन गाईडलाईन्समध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे.
केंद्र सरकारने कोरोना महामारीदरम्यान 18 पेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी नवी गाईडलाईन्स जारी केली आहे. यानुसार मुलांना रेमडेसिव्हीर इंजेक्शन देऊच नये असं या गाईडलाईन्समध्ये सांगितलं आहे. लहान मुलांना रेमडेसिव्हीर इंजेक्शन अजिबात देऊ नये, तसंच 5 वर्षांखालील मुलांना मास्क लावण्याची गरज नाही, असं म्हटलं आहे. नव्या गाईडलाईन्सनुसार, 5 वर्षांखालील मुलांना मास्क लावणं बंधनकारक नाही. तर 6-11 वर्षाच्या मुलांनी आई-वडिलांच्या देखरेखीखाली मास्क लावू शकतात. तसंच 12 वर्षावरील मुलं मास्क वापरु शकतात.
केंद्राच्या नव्या नियमानुसार, मुलांना उपचारादरम्यान स्टिरॉईड न देण्याचा सल्ला दिला आहे. स्टिरॉईट केवळ अत्यावश्यक, गंभीर स्थितीत असलेल्याच मुलांना आवश्यकतेनुसार द्यावे. तसंच योग्य काळासाठीच अशी औषधं दिली जातील याचं भान ठेवावं, असाही सल्ला देण्यात आला आहे.