Home Cities जळगाव लवकरच दररोज धावणार राजधानी एक्सप्रेस !

लवकरच दररोज धावणार राजधानी एक्सप्रेस !

0
92

जळगाव प्रतिनिधी । सध्या आठवड्यातून दोनदा धावणारी राजधानी एक्सप्रेस लवकरच दररोज धावण्याची शक्यता असून याबाबत येत्या काही दिवसांमध्ये घोषणा होऊ शकते.

याबाबत वृत्त असे की, अलीकडेच जळगावमार्गे राजधानी एक्सप्रेस सुरू झाली आहे. यामुळे दिल्ली आणि मुंबईकडे जाणार्‍या प्रवाशांना अतिशय गतीमान अशी सुविधा मिळाली आहे. जिल्ह्यात फक्त जळगाव येथेच या सुपरफास्ट एक्सप्रेसला थांबा आहे. खरं तर, भुसावळ जंक्शनलाही ही एक्सप्रेस थांबणे अपेक्षित असल्यामुळे थोडा नाराजीचा सूर उमटला आहे. यातच ही रेल्वे गाडी फक्त दोन दिवसच धावत असल्यामुळे इतर दिवशी प्रवासाचे नियोजन असणार्‍यांची गैरसोय होत आहे. या पार्श्‍वभूमिवर, लवकरच ही राजधानी एक्सप्रेस दररोज धावू शकते. याबाबत येत्या काही दिवसांमध्ये घोषणा होण्याची शक्यता आहे. यामुळे अर्थातच जिल्ह्यातील प्रवाशांची सोय होणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound