चाळीसगावात स्नेहसंमेलनास उत्साहात प्रारंभ

चाळीसगाव प्रतिनिधी । आयुष्यात आपल्याला जे काही उच्च पदे व मान मिळतात ते शिक्षणामुळेच मिळू शकते आणि त्यातूनच आपल्या जीवनात आपण चांगले व्यक्ती म्हणून जगू आणि वावरू शकतो असे प्रतिपादन सौ.स्मिताताई बच्छाव यांनी वार्षिक स्नेहसंमेलन उदघाटन प्रसंगी केले.

बी.पी.आर्टस्,एस.एम.ए.सायन्स,अँड के.के.सी.कॉमर्स कॉलेज आणि के.आर.कोतकर कनिष्ठ महाविद्यालय वार्षिक स्नेहसंमेलनाचे महाविद्यालयाच्या प्रांगणात मोठ्या जल्लोषात उदघाटन झाले. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष नारायणभाऊ अग्रवाल, चेअरमन मॅने. बोर्ड,चा.ए.सोसायटी होते तर कार्यक्रमाचे उदघाटन सौ.स्मिताताई बच्छाव यांच्या शुभहस्ते झाले. संस्थेचे अध्यक्ष माजी प्राचार्य बाळासाहेब चव्हाण , सिनिअर कॉलेज कमिटीचे चेअरमन डॉ.एम.बी.पाटील,डॉ. विनोद कोतकर,सचिव, अ‍ॅड.प्रदीप अहिरराव, राजू अण्णा चौधरी, प्राचार्य डॉ.मिलिंद बिल्दीकर, उपप्राचार्य डॉ.प्रकाश बाविस्कर, उपप्राचार्या मुठाणे मॅडम, उपप्राचार्य अजय काटे, उपप्राचार्य बी.आर.येवले ,कलामंडळ प्रमुख प्रा.अप्पासाहेब लोंढे, कार्यालयीन अधीक्षकहिलाल पवार उपस्थित होते. प्रारंभी महाविद्यालयाच्या सारिका बोरसे, सुश्रुता वसईकर यांनी स्वागतगीत सादर केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बिल्दीकर यांनी काल झालेल्या विभागीय युवारंग स्पर्धेमध्ये एकूण १४ पारितोषिक मिळाल्याचे सांगून महाविद्यालयातील या कलाकारांचे अभिनंदन केले. अशीच कला आपण शिक्षणासोबतच जोपासली पाहिजे असे मनोगतात सांगितले. या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये एकूण २५ गायन व नृत्य कला सादर केल्या त्यामध्ये भजन,लावणी,लोकगीत,कोळीगीत,लोकसंगीत आणि गझल विद्यार्थ्यांनी सादर केल्या असे आप्पासाहेब लोंढे यांनी सांगितले. ज्याच्याकडे शैक्षणिक ज्ञान जास्त तो सर्वात श्रीमंत आपल्याला शिक्षणामुळे जीवनात महत्व प्राप्त झाले आहे आयुष्यात आपल्याला जे काही उच्च पदे व मान मिळतात ते शिक्षणामुळेच मिळू शकते आणि त्यातूनच आपल्या जीवनात आपण चांगले व्यक्ती म्हणून जगू आणि वावरू शकतो तसेच या वयात विद्यार्थीदशेत आपण शिक्षणासोबतच जीवनाचा मनमुराद आनंद घेतला पाहिजे असे वार्षिक स्नेहसंमेलन उदघाटन प्रसंगी मा.सौ.स्मिता बच्छाव म्हणाल्या. शेवटी आपल्या अध्यक्षीय मनोगतात नारायणभाऊ अग्रवाल म्हणाले की या वार्षिक स्नेहसंमेलनात आपल्यामध्ये असलेले कलागुण सादर करण्याची संधी तुम्हाला आहे परंतु हे करत असताना शिक्षणाकडे सुद्धा आपण अशाच पद्धतीने यश प्राप्त करून समाजसेवेचा वसा आपण घेतला पाहिजे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा.डी एल.वसईकर यांनी मानले.

Add Comment

Protected Content