जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत निशिता पेंढारकर प्रथम

एरंडोल प्रतिनिधी । राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मु.जे. महाविद्यालयात घेण्यात आलेल्या वकृत्व स्पर्धेत एरंडोल येथील दि.श.विद्यालयाची अकरावीची विद्यार्थीनी निशिता सुधीर पेंढारकर हिने जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला.

निशिताने उपस्थितासमोर मतदान करणे हि किती महत्वपूर्ण भुमिका असते तसेच मतदार हा कसा राजा आसतो व मतदान करतांना कोणत्या गोष्टी मतदाराने विचार करून मतदान करावे कारण प्रत्येक उमेदवार हा आपली बाजू मतदारांपुढे मांडतो ती खरी आहे की नाही याचा देखील विचार मतदाराने करावा. कुठल्याही अमिषाला बळी पडू नये व आपले अमूल्य मत विचारपूर्वक द्यावे. तसेच निवडणुकी नंतर उमेदवाराने दिलेल्या आश्‍वासनाचा पाठपुरावा करावा. तरच मतदार हा खरा राजा ठरू शकतो असे तिने भाषणातून सांगितले.

पाचोरा येथील एस.एस.एम.एम.महाविद्यालयात निशिताला जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांच्या हस्ते प्रशिस्ती पत्र व रोख रुपये एक हजार रूपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले. दि.श. महाविध्यालयाकडून देखील निशिताचे अभिनंदन करण्यात आले.

Add Comment

Protected Content