लग्नात नाचण्याच्या कारणावरून तरूणावर चाकूहल्ला

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । लग्नात नाचणाच्या कारणावरून एकाला शिवीगाळ करून चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना जामनेर तालुक्यातील मांडवे खुर्द येथे घडली आहे. याप्रकरणी सोमवारी २७ फेब्रुवारी रोजी पहूर पोलीस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहूर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, हानिफ चिंधू तडवी (वय-४०) रा. मांडवे खुर्द ता. जामनेर हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २५ फेब्रुवारी रोजी मांडवे गावात लग्न कार्य होते. या लग्नात नाचण्याच्या कारणावरून याला गावात राहणारा अनिस मस्तान तडवी याने हानीफ तडवी यांचा मुलगा समीर तडवी याला शिवीगाळ करूण धक्काबुक्की केली. त्यानंतर हातातील चाकूने छातीवर वार करून गंभीर जखमी केले. हा प्रकार घडल्यानंतर त्याला तातडीने खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या घटनेबाबत सोमवारी २७ फेब्रुवारी रोजी पहूर पोलीस ठाण्यात हानीफ तडवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी अनिस तडवी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार हंसराज मोरे करीत आहे.

Protected Content