नागपूर (वृत्तसंस्था) नागपूर- भंडारा महामार्गावर आज पहाटे लग्नाचे वऱ्हाड घेऊन निघालेली बस रस्त्यात उभ्या कंटेनरला धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात सहाजण जागीच ठार झाले. तर दहा जण जखमी आहेत.
पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, बस भंडारा जिल्ह्यातून लग्न वऱ्हाड घेऊन नागपूरला परत येत होती. नागपूर भंडारा रोडवर मौदा पोलिस स्टेशन अंतर्गत शिंगोरी गावाजवळ रस्त्यात उभ्या कंटेनरला धडकली. तेव्हा भला मोठा आवाज झाला. या अपघातात ६ जण जागीच ठार, १० जखमी झाले आहेत. बसमध्ये नागपूर येथील गांधीबागच्या पोलिस कॉलनीमधील परिवार असल्याची माहिती आहे.