भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील वेल्हाळा येथील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमीष दाखवत अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, तालुक्यातील वेल्हाळा येथील रहिवाशी असलेली १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसोबत राहते. २४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास विधी संघर्षीत मुलगा आणि रविण खाटीक दोघे रा. हिवरखेडा ता. जामनेर यांनी अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमीष दाखवत दुचाकीने पळवून नेवून नशिराबाद येथील एका शेतात शारिरीक अत्याचार केल्याची घटना उघडकीला आली आहे. पिडीत मुलीच्या वडीलांच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलीस ठाण्यात दोन जणांवर अत्याचार व अत्याचारास मदत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधिक्षक नितीन गणपुरे करीत आहे.