रोजगार हमी योजनेतंर्गत केळी पिकाचा समावेश

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत शासनाने केळी (३ वर्ष) हे पिक नव्याने समाविष्ट केले आहे. त्यानुसार या योजनेतंर्गत लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतक-यांनी अर्ज करण्याचे आवाहन संभाजी ठाकूर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

 

पात्र लाभार्थी :-अनु. जाती, अनु. जमाती, भटक्या जमाती, निरधी सुचित जमाती (विमुक्त जमाती) दारिद्र रेषेखालील कुंटुब, स्त्री कुटुंब प्रमुख असलेले कुटुंब, दिव्यांग व्यक्ती कुटुंब प्रमुख असलेले कुटुंब, जमीन सुधारणाचे लाभार्थी, प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण योजनेखालील लाभार्थी, अनुसूचित जमातीचे व इतर पारंपारीक वनवासी (वन हक्क मान्य करणे) अधिनियम -2006पात्र लाभार्थी,  या प्रवर्गामधील 1 ते 10 पात्र लाभार्थींना प्राधान्य देण्यात आल्यानंतर कृषि कर्ज माफी योजना सन 2008 या मध्ये व्याख्या केलेले अल्पभुधारक (5 एकर पर्यंत) सीमांत भुधारक  (2.5 एक पर्यंत) यांना प्राधान्य देण्यात येईल.

 

क्षेत्र मर्यादा :-  या योजनेतंर्गत कमीत कमी ०.०५ हेक्टर क्षेत्र व जास्तीत जास्त २.०० हेक्टर क्षेत्र मर्यादा असेल.

आवश्यक कागदपत्रे :- मजुर कार्ड, ग्राम पंचायतीने मान्य केलेली लाभार्थी यादीत  नाव असणे आवश्यक, प्रपत्र अ अर्जाचा नमुना प्रपत्र व संमती पत्र (फळ बागेचे कार्य ग्राम पंचायत किंवा कृषि विभाग यापैकी कोणाकडून राबविण्यात रस आहे याचा स्पष्ट उल्लेख लाभार्थीने करावा), लागवड करावयाच्या जागेचा ७/१२ उतारा, ८ अ खाते उतारा.

 

देय अनुदान :- केळी पिकाचे लागवड अंतर १.८ X १.५० मीटर –

प्रथम वर्ष देय अनुदान प्रति हेक्टर रक्कम रु. १,७३,०८४/- दुसरे वर्ष अनुदान रक्कम रु. ४३,७४८/- तिसरे वर्ष रक्कम रु.३६,२००/- असे एकुण देय अनुदान रक्कम रु.२,५३,०३२/- लाख रुपये ३ वर्षांसाठी देय राहिल.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकरी लाभार्थ्यांनी आपल्या तालुक्यातील तालुका कृषि अधिकारी यांचे कार्यालयाशी संपर्क करावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. ठाकूर यांनी केले आहे.

Protected Content