खान्देशसाठी जळगाव येथे स्वतंत्र विभागीय आयुक्तालय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । केळी विकास महामंडळासाठी १०० कोटी रूपयांची तरतूद करण्यात येईल. त्याचबरोबर खान्देशसाठी जळगाव येथे स्वतंत्र विभागीय आयुक्तालय होणार असून सोबत बोदवड उपसा सिंचन योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात येईल. अशा जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. पोलीस कवायत मैदान येथे मंगळवारी २७ जून रोजी सायंकाळी ७ वाजता ‘शासन आपल्या दारी’ या अभियानाच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, वैद्यकिय शिक्षण, ग्रामविकास, क्रीडा मंत्री गिरीष महाजन, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेष महाजन, आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, ‘शासन आपल्या दारी’ अभियानात जळगाव जिल्ह्यात ३ लाख ३ हजारपेक्षा अधिक नागरिकांना लाभ देण्यात आला आहे‌. मागील एक वर्षात शासनाने सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले. शिवाय जळगाव शहर खड्डेमुक्त करण्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. जिल्ह्यातील रखडलेल्या प्रकल्पांना गती दिली जाईल. अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्यासह जिल्ह्यतील लोकप्रतिनिधींनी त्यांच्या भाषणात मागणी केलेल्या याबाबींवर मुख्यमंत्र्यांनी यावेळी या घोषणा केल्या.

Protected Content