रावेर,लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | रावेर शहरात रेशन दुकानांद्वारे धान्य व साखर मिळावे तसेच पूर्वी प्रमाणे खाद्यतेलाची देखिल वाटप करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेस शहराध्यक्ष महेमुद शेख तहसीलदार कार्यालयाला निवेदनाद्वारे केली आहे.
रावेर शहरात रेशन दुकानांद्वारे मिळणारे धान्य व साखर रावेर शहरात मिळाले नाही. २०२२ जानेवारी महिन्याचे मोफतचे धान्य बाकी असून फेब्रूवारी महिन्याचे रेग्युलर व मोफतच मिळणारे धान्य व साखर मार्च महीना लागला देखील अद्याप लाभार्थीना मिळाले नाही. तसेच जानेवारी व फेब्रूवारीची अंत्योदय योजनेंतर्गत साखरेचे देखिल वाटप झाली नाही. आधीच महागाईमुळे हातावर पोट असणाऱ्या गरीब कुटुंबाचे प्रचंड हाल होत आहे. तेलाचे भाव गगनाला भिडले असून गरीब कुटुंबाना रेशन दुकानांद्वारेपूर्वी प्रमाणे खाद्यतेल वाटप करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यांची होती उपस्थिती
यावेळी पंचायत समिती सदस्य दिपक पाटील, प्रदीप गेरा, शुभम गेरा, शेख तायर, विसम अकरम, शे.रऊफ शे. कादर,शे. शकिल शे. गुलाम ,निसार शेख, इमरान खान, शेख नफीस, भागवत चौधरी, बबिता तडवी, हसीना तडवी, रईस जबार आदी राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.