जळगाव सचिन गोसावी । जळगाव शहर आणि ग्रामीण भागातील केसरी रेशनकार्डधारकांना दोन रूपये किलोप्रमाणे स्वस्त धान्य उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी आज लहुजी ब्रिगेड महाराष्ट्रच्यावतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
निवेदनाचा आशय असा की, जळगाव शहर व ग्रामीण भागांमध्ये केसरी रेशन कार्ड धारक ७० हजार ९७५ चे दोन रुपये प्रति किलो स्वस्त धान्यापासून वंचित आहे. कोरोना काळापासून ते लोकडाऊन या रेशनकार्डधारक बेरोजगार, उपेक्षित, दलित, आदिवासी, भटके विमुक्त जातीचे, अल्पसंख्यांकांना मुस्लिम काबाडकष्टकरी हातावर पोट भरणारे यांच्या हाताला काम नाही. अशातच यांना केशरी रेशन कार्ड व धान्य मिळत नसल्याने त्यांची उपासमारीची वेळ आली आहे. केशरी रेशन कार्डधारकांना जळगाव शहर व ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना प्रति दोन रुपये किलो स्वस्त धान्य ७० हजार ९७५ लोकांना देण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना द्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे. याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष सुरेश अंभोरे, महिला आदिवासी आघाडी प्रदेश अध्यक्ष मुमताज तडवी, महिला आघाडी प्रदेश अध्यक्ष आशा आंभोरे आदी उपस्थित होते.
https://www.facebook.com/508992935887325/videos/216397230196061