संत बाबा गेलाराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त शहरातून मिरवणूक ( व्हिडीओ )

0

sindhi

जळगाव (प्रतिनिधी)। संत बाबा गेलारामसाहेब यांचा १२ मार्च रोजी सकाळी १० वाजेपासून ८९वा जन्मोत्सव ट्रस्ट व सिंधी समाज बांधवांच्या वतीने शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने सकाळी १० वाजता पूज्य सेवा मंडळ येथून शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली.

शोभायात्रेत संत बाबा हरदासराम व संत बाबा गेलाराम यांच्या प्रतिमा ठेवून घोड्याच्या रथावर मिरवणूक काढण्यात आली. बाबा हरदासराम मंगलकार्यालयात जिल्ह्यातील विविध शहरांतून आलेल्या ५६ बालकांचा जनेऊ संस्कार कार्यक्रम होत आहे. तर रात्री संत बाबा हरदासराम साहेब व बाबा गेलारामसाहेब यांच्या जीवनावर आधारित भजनांचा कार्यक्रम होणार आहे. समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे ट्रस्टच्या वतीने कळवण्यात आले आहे. सिंधी कॉलनीतून ही रॅली काढण्यात आली होती. यावेळी सिंधी समाजातील महिला व पुरूषांसह तरूण वर्गाने मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला आहे.

पहा । गेलारामसाहेबांच्या प्रतिमा मिरवणुकीत समाज बांधवांचा प्रचंड प्रतिसाद

Leave A Reply

Your email address will not be published.

Protected Content