रेल्वे मालधक्का माथाडी कामगार युनियनतर्फे हमाल बांधवांना दिवाळीनिमित्त मिठाई वाटप

जळगाव, प्रतिनिधी | येथे दीपावलीनिमित्त रेल्वे मालधक्का माथाडी कामगार सेनेतर्फे ४५० कष्टकरी हमाल बांधवांना मिठाई वाटप करण्यात आली व ५० भगिनींचा साडी व मिठाई देऊन सत्कार करण्यात आला.

 

रेल्वे मालधक्का माथाडी कामगार सेनेतर्फे आयोजित मिठाई व साडी वाटप कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी उप महापौर डॉ. अश्विन सोनवणे, शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, सागर पहेलवान सोनवणे, योगेश गालफाडे, रेल्वे मालधक्का माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष मुकेश उर्फ आबा बाविस्कर, केशव पोळ, लक्ष्मण पोळ, विजय पुरोहित, सचिन पुरोहित, रिताराम पुरोहित, राधेश्याम व्यास, माथाडी निरीक्षक वाघ आदी व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी लहू हटकर, राजू भाट, विक्की माने, संतोष हटकर, सुरेश बाविस्कर, राजू जोंटी, भिकनमामु शेख, ब्रिजलाल नाईक, धनसिंग पवार, शंकर ठाकूर, छोटू कोळी, विजय पवार, चतरु मामा वना पाटील, अशोक जाधव, मधुकर रोकडे, घनश्याम जगताप, अजय नाईक, गजानन ठाकरे, नेहरू बाबा, विठ्ठल राव दरबार चव्हाण, शब्बीर बाबा, पवन पाटील आदींसह हमाल माथाडी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन रेल्वे मालधक्का माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष मुकेश उर्फ आबा बाविस्कर यांच्या वतीने करण्यात आले होते.

Protected Content