नांद्रा येथे स्व.बापुराव बाविस्कर यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम

पाचोरा, प्रतिनिधी | तालुक्यातील नांद्रा येथे माजी सरपंच व माजी पंचायत सदस्य व परिसरात अष्टषैलू मितभाषीक व खान्देशी बोली भाषा अहिराणीवर पकड असणारे नटसम्राट जेष्ठ शिवसैनिक स्व. बापूराव नामदेव बाविस्कर यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबीर व शिवचरित्र व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

 

स्व.बापुराव बाविस्कर यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त शिवस्मारक गृप, राजे संभाजी मिञ मंडळ, बाविस्कर परिवार व गावातील तरुणमीञ मंडळी व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने आयोजक संयोजक वाल्मीक बापुराव बाविस्कर यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबीराला गावातील ३२ तरुणांनी रक्तदान केले. याप्रसंगी कोल्हापूर तालुक्यातील पन्हाळा येथील श्रीकृष्णा पाटील गुरुजी यांचे शिवचरित्रावर व्याख्यान झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलचे संचालक डॉ. भूषण मगर (पाटील) हे होते. तर प्रमुख उपस्थितांमध्ये नगरसेवक विकास पाटील, एस. ए. पाटील, नितिन तावडे, सरपंच, उपरपंच, ग्रा.प. कमिटी सदस्य, वि. का. सो. सदस्य, पोलिस पाटील, महादेव मंदिर संस्थान सदस्य व गावातील जेष्ठ श्रेष्ठ मान्यवर तथा जेष्ठ शिवसैनिक, तरुणमिञ यांचेसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व माता भगिनी उपस्थित होते. सूञसंचालन एस. ए. पाटील, प्रास्ताविक वाल्मीक बाविस्कर तर आभार विनोद बाविस्कर यांनी मानले. यश्वीतेसाठी शिवस्मारक गृप, राजे संभाजी महाराज मिञ मंडळी, बाविस्कर मिञ परिवार व ग्रामस्थ यांनी परीश्रम घेतले.

Protected Content