रेल्वेलाईनजवळ अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळला

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गेंदालाल मिल परिसरात परिसरातील रेल्वे लाईनजवळील दर्ग्यासमोर बुधवार, १५ फेब्रुवारी रोजी साडेतीन वाजेच्या सुमारास अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव शहरातील गेंदालाल मिल परिसरात एजाज खान नासीर खान वय ३० वर्ष हे राहतात. एजाज खान यांना बुधवारी गेंदालाल मिल परिसरातील रेल्वेलाईनजवळ दर्ग्यासमोर बेशुध्दावस्थेत पडलेल्या अवस्थेत एका अनोळखी बेवारस व्यक्ती मिळून आला. एजाज खान यांनी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ रेणुका भंगाळे यांनी त्यास मयत घोषित केले. याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ रेणुका भंगाळे यांच्या खबरीवरुन शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक ललीत भदाणे हे करीत आहेत.

मयताचे अंदाजे वय २५ वर्ष, रंग सावळा, चेहरा लांबट, शरीराने सडपातळ, केस मोठे, अंगात राखाडी रंगाचे चैने असलेले जॅकेट, त्यावर इंग्रजीत सुपर स्पोर्ट असे लिहलेले, तसेच काळ्या रंगाची जिन्स पॅन्ट, तपकीरी रंगाची अंडरवियर असे मयताचे वर्णन असून त्याची ओळख पटविण्याचे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे, कुणाला काही माहिती मिळाल्यास त्यांनी शहर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असेही पोलिसांनी कळविले आहेत.

Protected Content