रुग्णालयात नातेवाईकांना रुग्णांशी बोलण्यासाठी विशेष जागा करणार : राजेश टोपे

मुंबई (वृत्तसंस्था) कोविड रुग्णालयात यापुढे रुग्णांच्या नातेवाईकांना प्रवेश नाकारता येणार नाही. रुग्णालयात एक जागा ठेवावी जिथे रुग्ण आणि नातेवाईकांना बोलता येईल. तसेच आयसीयूमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचेही आदेश दिले आहेत, असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

 

टोपे पुढे म्हणाले की, राज्यात कम्युनिटी स्प्रेड नाही. पॉझिटिव्ह रुग्ण घरी संस्थात्मक विलगीकरणात आहेत. त्यामुळे राज्यात कम्युनिटी स्प्रेड झालेला नाही. महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली जाईल. कोरोनाच्या काळात ज्या समस्या समोर येतायत त्यावर देखरेख ठेवतील. प्रत्येक जिल्ह्यात कोरोनासाठी एक हेल्पलाईन असावी त्याची अमलबजावणी ही समिती करेल. कोरोना मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी व्यवस्था करण्यासाठीही ही समिती लक्ष देईल. जिथे लोक बेशिस्तीने वागतायत, तिथे स्थानिक प्रशासन जनता कर्फ्यू लावत असेल तर कोरोनाचा प्रसार वाढू नये यासाठी तसे अधिकार त्यांना दिले आहेत, असेही टोपे म्हणाले. काही भागात अनावश्यक गर्दी वाढत आहे. त्यामुळे विनाकारण बाहेर फिरु नये यासाठी दोन किलोमीटरचा निर्णय घ्यावा लागत आहे. जिथे लोक बेशिस्तीने वागतायत, तिथे स्थानिक प्रशासन जनता कर्फ्यू लावत असेल तर कोरोनाचा प्रसार वाढू नये यासाठी तसे अधिकार त्यांना दिले असल्याचेही टोपे यांनी स्पष्ट केले आहे.

Protected Content