मुंबई- वृत्तसंस्था ; – सुशांतसिंह राजपूत मृत्यूच्या तपासात अमली पदार्थांचा मुद्दा समोर आल्यानंतर नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने चौकशी करून अनेकांना ताब्यात घेतलं. रविवारी सुमारे ६.३० तासांच्या चौकशीनंतर एनसीबीने पुन्हा एकदा रिया चक्रवर्ती हिला सोमवारी कार्यालयात बोलावलं. आज रियाला शौविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा आणि दिपेश सावंत यांच्यासमोर बसवून थेट प्रश्न विचारले जाणार होते या साऱ्यांची उलट तपासणीही केली जाईल, असे सांगण्यात आले होते
एनसीबीच्या चौकशीच्या दुसर्या दिवशी रिया चक्रवर्तीने पुन्हा एकदा दावा केला आहे की तिने सुशांतसाठी अमली पदार्थ विकत घेतले होते. पण तिने कधीही त्याचा वापर केला नाही. रिया चक्रवर्तीने चौकशीच्या दुसर्या दिवशी बॉलिवूडमधील काही बड्या लोकांची नावं घेतल्याचं समोर आलं आहे. सुमारे १८ ते १९ जणांची नावं रियाने घेतली असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे आता बॉलिवूड सेलिब्रिटींवरही चौकशीची टांगती तलवार लटकत आहे
वैद्यकीय मंडळाची बैठक १७ सप्टेंबरला होणार आहे. या फॉरेन्सिक पॅनेलमध्ये एकूण सहा डॉक्टर असतील. हे पॅनेल प्रथमच अशा उपकरणांचा वापर करणार आहे ज्याचा वापर अमेरिकन एजन्सी एफबीय करते. या माध्यमातून फॉरेन्सिक टीम सुशांतला कोणता विषारी पदार्थ देण्यात आला की नाही याचा शोध घेण्याचा प्रयत्न करणार आहे.