जळगाव, प्रतिनिधी | महापालिकेने केलेली घरपट्टी करवाढ रद्द करावी या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया (आठवले गट) वतीने महापालिकेसमोर महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करून आयुक्तांना निवेदन देण्यात आले.
निवेदनाचा आशय असा की, करयोग्य मुल्य निश्चितीबाबत विशेष नोटीस प्रसिद्ध करण्यात आल्या असुन दर्शविलेली वाढीव कर व इतर आकार हे अवाजवी व मनमानी पद्धतीने असुन सदर घरपट्टी करवाढ ही जळगावकर सर्व सामान्यांना अवाजवी असुन त्याबदल्यात महानगरपालीका सर्वसामान्य जनतेला कोणत्याही सुखसोई पुरविण्यास असमर्थ ठरलेली आहे. सध्याच्या परिस्थितीत आरोग्य, रस्ते, स्वच्छता, गटारी ह्याकडे महानगरपालीकेचे दुर्लक्ष असून नागरीकांना ह्यामुळे फार मोठ्या कटू प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे व अश्या परिस्थितीत आपण घरपट्टी कर वाढीचा प्रस्ताव आणून जनतेवर अन्याय करणारे होत आहे. कोरोनाच्या जागतिक महामारीत सर्वसामान्य जनतेची आर्थिक परिस्थिती ढासळलेली असतांना त्यांचेवर ही करवाढ न करता त्याऐवजी त्यांना दिलासा देणेकामी करयोग्य मुल्यात ५०% करमाफी देऊन जळगांवकरांना दिलासा दिल्यास ह्याद्वारे महाराष्ट्रात एक चांगला संदेश जाईल व त्याद्वारे जळगाव तसेच आपले नांव लौकीक वाढण्यास मदत होईल. त्यामुळे आमच्या निवेदनाचा विचार करून घरपट्टी करवाढ ही तात्काळ रद्द करावी व ५०% घरपट्टी करात सुट द्यावी, हि विनंती. अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया (आठवले गट) जळगाव च्या वतीने जन आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आला. याप्रसंगी जिल्हा सचिव भरत मोरे, तालुका अध्यक्ष रमाबाई ढिवरे, कार्याध्यक्ष, सागर सपकाळे, महानगर उपाध्यक्ष प्रताप बनसोडे, युवक अध्यक्ष मिलींद सोनवणे, सचिन अडकमोल, मनोहर इंगळे, बबलू शिंदे, नरेद्र मोरे, अनिल लोंढे, शोएब पिंजारी, भिमराव सोनवणे, शांताराम अहिरे, संदीप तायडे, रफिक पिंजारी, सतिष गायकवाड, ज्ञानेश्वर अहिरे, सागर पवार, हरीष शिंदे, विशाल महाले, चंद्रकांत हातागडे, सागर गायकवाड, निलेश खरोटे, ‘अक्षय मेघे, शेखर सोनवणे, अविनाश पारधे, शाहरूख पटेल, अक्षय मोरे, हितेश कोळी, अक्षय बोदडे, प्रफुल्ल वानखेडे, मानव गायकवाड, सागर खैरनार,विकी अहिरे, आकाश नाईक, वसीम पटेल, अजय अडकमोल आदी सहभागी झाले होते.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/140135824959716