जळगाव, प्रतिनिधी | शहरात सिंधी कॉलनी येथून रिक्षा प्रवासी म्हणून बसलेल्या व्यक्तीचा धावत्या रिक्षात चक्कर येवून काही वेळातच मृत्यू झाल्याची घटना गुरुवार दि. ९ डिसेंबर रोजी घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
धावडा येथील सय्यद रसूल हे कामानिमित्ताने जळगावात आले होते. गुरुवारी ते सिंधी कॉलनी येथून रिक्षात बसले. प्रवासादरमयन अचानक सय्यद रसूल यांना चक्कर आले. रिक्षाचालक वासुदेव मुरलीधर पाटील यांनी त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात हलविले. याठिकाणी वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांना मृत घोषित केले. रसूल यांच्याजवळ असलेल्या कागदपत्रांवरुन त्यांची ओळख पटली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक जयंत कुमावत हे करीत आहेत.