जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील रामेश्वर कॉलनी येथील विवाहितेने तिच्या माहेरुन रिक्षा घेण्यासाठी ५० हजार रुपये आणावेत या कारणावरुन तिचा छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या ४ जणांविरोधात एमआयडीसी पेालिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असे की, जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी येथे मंगलाबाई राजू माळी यांचा इंदोर येथील राजू माळी यांच्याशी विवाह झाला आहे. लग्नानंतर काही दिवस चांगले गेल्यावर पती राजू माळी याच्यासह इतरांनी विवाहिता मंगलाबाई हिस तिने माहेरुन रिक्षा घेण्यासाठी ५० हजार रुपये आणावेत या कारणावरुन तिचा शारिरीक व मानसिक छळ केला. छळ असह्य झाल्याने मंगलाबाई माळी या माहेरी जळगावात आल्या. याप्रकरणी मंगलाबाई हिच्या तक्रारीवरुन तिचे पती राजू शांताराम माळी, बबलाबाई शांतराम माळी दोन्ही रा. इंदोर, अनिनता रामेश्वर भोंगड, रामेश्वर भोंगड दोन्ही रा. धुळे या चार जणांविरोधात शनिवारी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.