रिक्षात आढळला देशी-विदेशी मद्यांचा साठा; जळगावच्या तिघांवर कारवाई

जळगाव प्रतिनिधी । लॉकडाऊनमध्ये गस्त घालत असतांना पोलिसांना रिक्षात संशयास्पद हालचाली आढळून आल्या. रिक्षाचा पाठलाग केला असता रिक्षातून ३१ हजार रूपये किंमतीच्या देशी-विदेशी मद्याचा साठा आढळून आला. सागर पार्क येथे पकडून रिक्षाचालकांसह तिघांना रामानंदनगर पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई
रामानंदनगर पोलीस ठाण्याचे सपोनि सुहास राऊत, स.फौ. गोपाळ चौधरी, विलास पवार, जयंत कुमावत, नितीन अत्तरदे, निलेश गंडगव्हाळ हे रामानंदनगर रोडवरील चर्च परिसरात गस्त घालत होते. यादरम्यान याठिकाणाहून जात असलेल्या (एमएच १९ व्ही ३४७६) या क्रमाकांच्या रिक्षावर संशय आला. कर्मचार्‍यांनी तपासणीसाठी रिक्षाचालकाला थांबण्याचा इशारा गेला. मात्र पोलिसांना पाहताच रिक्षाचालकाने चर्च परिसरात गल्ल्यांमधून रिक्षा पळविली. सागरपार्क परिसरात पाळलाग करुन पथकाने रिक्षा पकडली. तपासणी केली असता रिक्षात मद्याच्या बाटल्या आढळून आल्या.

तिघांना अटक
पोलिसांनी चौकशी केली असता, रिक्षाचालक शेख निजामुद्दीन शेख खुशूबुद्दीन (वय-३३), रिक्षातील राकेश धनराज हटकर (वय-२१), आणि रविंद्र राजू हटकर (वय-३०) तिघे रा. तांबापुरा असे तिघा संशयित आरोपींचे नाव आहे. त्याच्याकडे मद्यवाहतुकीसह मद्य पिण्याबाबतचा कुठलाही परवाना नव्हता. पोलिसांनी रिक्षा जप्त करत रामानंदनगर पोलीस ठाण्यात आणली. रिक्षासह ३१ हजार ३२० रुपयांच्या मद्याच्या बाटल्या असा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस कर्मचारी विलास पवार यांच्या फिर्यादीवरुन तिघांविरोधात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.

Protected Content