Home Cities धरणगाव छत्रपती क्रांती सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी लक्ष्मण पाटील

छत्रपती क्रांती सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी लक्ष्मण पाटील

0
56


 

धरणगाव, प्रतिनिधी । येथील सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण पाटील यांची छत्रपती क्रांती सेनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की , छत्रपती क्रांती सेनेचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मिसाळ पाटील यांच्या सहीचे नियुक्तीपत्र लक्ष्मण पाटील यांना मिळाल्याचे बामसेफ जिल्हाध्यक्ष प्रकाश इंगळे यांनी जाहीर केले. संघटनेचे काम अविरत सुरू ठेवणे व फुले – शाहू -आंबेडकर यांची विचारधारा रुजविणे या उद्देशाने विविध सहयोगी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. “छत्रपती” या नावातच क्रांती आहे. ती क्रांती घराघरात पोहचविण्यासाठी प्रयत्न करणं आणि त्या पदाला न्याय देणं ही आपली सर्वांत मोठी जबाबदारी असल्याचं लक्ष्मण पाटील म्हणाले या निवडीबाबत सर्व स्तरातून आनंद व्यक्त होत आहे. सामाजिक , शैक्षणिक, राजकीय, सहकार, व्यापार इ. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या व पुढील यशस्वी वाटचालीची अपेक्षा व्यक्त केली. या भरभरून मिळालेल्या प्रेमळ प्रतिसादाबद्दल पाटील यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.


Protected Content

Play sound