जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील खैरनार ऑप्टीकल ते चित्रा चौक दरम्यान रिक्षा चालकाचा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना बुधवारी २७ सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता घडली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, सागर सुरेश सोनवणे (वय-२२) रा. सुरेशदादा जैन नगर, कानळदा रोड, जळगाव येथे तरुण आपल्या परिवारासह वास्तव आहे. रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह चालवतो. बुधवारी २७ सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास खैरनार आप्टीकल ते चित्रा चौक दरम्यानच्या रस्त्यावरून जात असतांना त्यांच्या रिक्षात ठेवलेला १० हजार रूपये किंमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. मोबाईल चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने मोबाईलचा सर्वत्र शोध घेतला परंतू मोबाईलचा कुठेही तपास लागला नाही. सायंकाळी ६ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक फौजदार बशीर तडवी करीत आहे.