रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणा : गहाळ झालेली कागदपत्रे मिळाली पुन्हा

 

भुसावळ, प्रतिनिधी  महत्त्वाचे कागदपत्रे हरीविल्यानंतर ती पुन्हा मिळविणे जिकरीचे ठरते, अशातच ती शैक्षणिक कागदपत्रे असली तर संबंधिताचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता असते. मात्र, अशाच एका  रिक्षा चालकाने त्याच्या रिक्षात प्रवाशी विसरून गेलेली प्रवेशाची कागदपत्रे असलेली फाईल पोलिसांच्या मदतीने प्रवाशास दिली.  प्रवाशाने ही रिक्षाचालकाचा प्रामणिकपणा पाहून त्यास रोख रक्कम बक्षीस दिली.  

शहरातील आनंद नगर रिक्षा स्टॉप परिसरातून रिक्षा चालक सुनील बुधा वरूळकर स्टॉप वरून विनोद नागवणी राहणार चिखली बुलढाणा या प्रवाशांची ट्रिप घेऊन गेले असतांना प्रवाशी त्यांची महत्वाची मेडिकल कॉलेजला अँडमिशनची कागदपत्रांची बॅग विसरून निघून गेले. 

रिक्षा चालकांला प्रवाशी बॅग विसल्याचे लक्षात येताच ट्रिप सोडल्या ठिकाणी पुन्हा येऊन प्रवाशांचा शोध घेतला असता प्रवाशी न मिळाल्याने रिक्षा चालकाने बॅग घेऊन बाजारपेठ पोलीस स्टेशन गाठले. ठाणे अंमलदार (पोना) महेश चौधरी यांची भेट घेतली. झालेली घटना बाबत सविस्तर माहिती दिली असता पोना महेश चौधरी यांनी सहाय्यक पोलिस अधिक्षक अर्चित चांडक यांची भेट घेऊन रिक्षा चालकांजवळील बॅग तपासणी केली असता त्यामध्ये मेडिकलची कागदपत्र मिळून आली.

तसेच त्यामध्ये संबंधित इसमाचा फोन नंबर मिळाल्याने सहाय्यक पोलिस अधिक्षक अर्चित चांडक मार्गदर्शनाखाली संपर्क साधून प्रवाशांना पोलीस स्टेशनला बोलवून हरविलेली बॅग रिक्षा चालकांच्या प्रामाणिकपणामुळे परत करण्यात आली. प्रवाशी विनोद नागवणी यांना त्यांची महत्वाची कागदपत्रांची बॅग रिक्षा चालकाच्या इमानदारीमुळे परत मिळाल्याने विनोद नागवणी यांनी रिक्षा चालक स्वतःच्या इच्छेने सुनील बुधा वरूळकर यांना २१०० रुपये रोख बक्षीस दिले. आजही देशात रिक्षा चलकांमध्ये इमानदारी जिवंत असल्याचे उदाहरण सुनील वरूळकर दाखवून दिले आहे.सदरची कामगिरी पोना महेश चौधरी,रविंद्र बिऱ्हाडे, पोकॉ ईश्वर भालेराव,गजानन वाघ अशांनी मिळून केली.

Protected Content