जळगाव प्रतिनिधी । शहरातील रिंग रोडवरील सायली हॉटेलजवळून एकाची २० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना १४ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. दोन दिवसानंतर शुक्रवारी सायंकाळी दुचाकी चोरी प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाघोदे येथील कमलाकर महाजन रा. वाघोदे ता. यावल हे जळगावात त्यांच्या दुचाकी (क्र. एमएच.१९.बीझेड.९३०३) ने १४ एप्रिल रोजी जळगावात आले होते. सायंकाळी त्यांनी सायली हॉटेलजवळ त्यांची दुचाकी उभी केली होती. दरम्यान, काम आटोपून दुचाकी उभ्या केलेल्या ठिकाणी ते आले असता, त्यांना दुचाकी दिसून आली नाही. आजू-बाजूच्या परिसरात शोध घेवून दुचाकी मिळून न आल्याने ती चोरी झाल्याची खात्री झाली. शुक्रवारी महाजन यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.