जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | ७३व्या सिनियर ५१व्या ज्युनियर आणि ३७व्या सबज्युनियर राष्ट्रीय ट्रॅक सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा नुकत्याच गुवाहाटी, आसाम येथे संपन्न झाल्या.
स्पर्धेत एकलव्य क्रीडा संकुलातील खेळाडू विद्यार्थिनी आकांक्षा गोरख म्हेत्रे हिने चमकदार कामगिरी करत सिल्व्हर व ब्रॉन्ज मेडल मिळवले.
आकांक्षा म्हेत्रे हिने सब ज्युनिअर गटातील ५०० मीटर टाईम ट्रायल प्रकारात ४०.७६ सेकंदाची वेळ नोंदवत सिल्व्हर मेडल पटकविले तसेच टीम स्प्रींट या प्रकारात ब्रॉन्ज मेडल मिळवले.
आकांक्षाचे हे आतापर्यंत राष्ट्रीय स्पर्धेत सातवे मेडल आहे.
राष्ट्रीय ट्रॅक सायकलिंग स्पर्धेत पदक मिळवणारी आकांक्षा ही जिल्ह्यातील पहिली खेळाडू ठरली आहे.
तिच्या या यशाबद्दल के.सी.ई. सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार जी बेंडाळे, के सी ई सोसायटीचे कोषाध्यक्ष डी टी पाटील, के सी ई सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर, एकलव्य क्रीडा संकुलाचे प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर तसेच आकांक्षाचे प्रशिक्षक अखिलेश यादव यांनी अभिनंदन केले.