बिबट्याचा धुमाकूळ : कुऱ्हाड शिवारात गोऱ्हा केला फस्त

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड बु” उमरदे शिवारात मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने नाईकनगर येथील शेतकऱ्याचा एका गोऱ्हाचा फडसा पाडल्याची घटना घडली आहे. यामुळे शेतकऱ्याचे सुमारे १५ हजार रुपयाचे नुकसान झाले आहे.

वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. गेल्या चार दिवसांपासून एका शेतकऱ्याला ट्रॅक्टर मधून मजूर कापूस वेचणीसाठी नेत असतांना धरणाजवळ बिबट्या आढळून आल्याने व सद्या कापूस वेचणीचे सिझन असल्याने मजूर वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाल्याने मजूर शेतात येण्यास धझावत नसल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

पाचोरा तालुक्यातील नाईकनगर येथील भिमराव बन्छी चव्हाण या शेतकऱ्यांने उमरदे – कुऱ्हाड बु” शिवारातील शेतात एक गाय व दोन गोऱ्हे बांधून घरी आल्यानंतर त्यांना सकाळी सहा वाजता शेजारी असलेल्या भालचंद्र चौधरी यांचा भ्रमणध्वनी आला व त्यांनी गोऱ्हा आरडाओरडा ओरड करीत असल्याची माहिती दिली. भिमराव बन्छी चव्हाण यांनी शेतात जावून पाहणी केली असता गोऱ्हा मयत अवस्थेत आढळून आला. घटनास्थळी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला. परीसरात भितीचे वातावरण निर्माण झाल्याने नागरीकांनी बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली.

Protected Content