राष्ट्रीय राजपूत करणी सेना पदाधिकाऱ्यांची राज्यपालांची भेट

 

पारोळा : प्रतिनिधी । राष्ट्रीय राजपूत करणी सेना पदाधिकाऱ्यांनी राज्यपाल भागवत सिंह कोश्यारी यांची भेट घेऊन निवेदन दिले.

प्रदेश अध्यक्ष ठाकूर अर्जुन सिंह, राष्ट्रीय महासचिव आनंदसिंग ठोके, महाराष्ट्र कोर कमिटी अध्यक्ष बाळासाहेब पाटील, प्रदेश प्रवक्ता सुरज सिंह ठाकुर, प्रदेश उपाध्यक्ष राम सिंह राजपूत, प्रदेश प्रभारी सुभाष सिंह ठोके, प्रदेश महासचिव जीतसिंह, व नागपूर जिल्हा महासचिव शत्रुघन सिंह चंदेल यांचा या शिष्टमंडळात समावेश होता

आर्थिक क्षमतेच्या आधारावरच आरक्षण देण्याविषयी महाराष्ट्र सरकारने शिफारस करावी, राज्यातील सर्व जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज व महाराणा प्रताप यांचा पुतळा स्थापित करण्यासाठी राज्य सरकार 50 टक्के स्थानिक प्राधिकरण 25 टक्के व श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेतर्फे 25 टक्के निधी उभारण्याचा प्रस्तावाला मंजुरीची शिफारस सरकारला करावी,

राजपूत क्षत्रीय समाजातील तरुणींना भारतीय सेना राज्याचे विभिन्न विभाग व पोलीस खात्यात नोकरी मिळण्यासाठी शिफारस करावी. वल्लभगड (फरीदाबाद) मधील निकिता तोमर हत्याकांडाचा तपास करून संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी, पद्मावत चित्रपटाला विरोधासाठी करणी सेनेच्या आंदोलनामुळे दाखल गुन्हे मागे घ्यावेत, अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांच्या नुकसानीचे पंचनामे झाले पण भरपाई मिळण्यास विलंब होत आहे नुकसान भरपाई त्वरित देण्यासाठी सरकारला निर्देश देण्यात यावे या मागणीचे निवेदन राज्यपालांना राष्ट्रीय राजपूत करणी सेनेतर्फे नुकतेच देण्यात आले.

Protected Content