राष्ट्रीय मुल निवासी बहुजन कर्मचारी संघातर्फे विविध मागण्यासाठी आंदोलन (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी  । राज्य शासनाच्या  शिक्षण नोकरीतील आरक्षण विरोधी धोरणास  विरोध करण्यासाठी  व इतर मागण्यासाठी  राष्ट्रीय मुल निवासी बहुजन कर्मचारी संघ व सहयोगी संघटनामार्फत नाशिक विभाग प्रभारी सुमित्र अहिरे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. 

अनुसूचित जाती अनुसूचित जमाती, भटकीय विमुक्त आणि विशेष मागास प्रवर्गातील निम सरकारी, सरकारी व शासकीय व सार्वजनिक सेवेतील कर्मचारी-अधिकारी यांचे पदोन्नतील आरक्षण रोखण्याचे धोरणाविरोधात राष्ट्रीय मुल निवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. शासकीय, निमशासकीय, शासन अनुदानित व सार्वजनिक उपक्रमातील आस्थापनामध्ये नियमाप्रमाणे बिंदू नामावली अद्यावत न करता नियम बाह्य भरती प्रक्रियेश विरोध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले. या इतर मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्यात. या आंदोलनप्रसंगी किशोर नारखेडे, खुशाल सोनवणे, दिनेश फुलपगार, योगेश नरवाडे,   सतीश नरवाडे, रियाज शेख, प्रवीण बिऱ्हाडे आदी उपस्थित होते. 

 

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/1434480996918819

 

Protected Content