राष्ट्रीय प्रज्ञाशोध परिक्षेत सुपर्ण अभिजीत जोशी राज्यात प्रथम

 

खामगाव, प्रतिनिधी । राष्ट्रीय प्रज्ञाशोध परिक्षेचा निकाल महाराष्ट्र शासनाने नुकताच जाहिर केला आहे. यामध्ये लॉयन्स ज्ञानपीठ खामगाव ईयत्ता १० वीचा विद्यार्थी सुपर्ण अभिजीत जोशी याने २०० गुणांपैकी १९३.५६ गुण मिळवून तो राज्यात प्रथम क्रमांकावर आला आहे.

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परिक्षा राज्यस्तरावर झाली असून या परिक्षेकरीता ९४५४१ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यामधून ७७४ विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावरील मे महिन्यात होणा-या परिक्षेकरीता निवड झाली आहे. राष्ट्रीय स्तरावरील परिक्षेत भारतातून ८००० विद्यार्थ्याची निवड झाली असून त्यापैकी २००० विद्यार्थी शिष्यवृत्तीकरीता पात्र ठरणार आहेत. सुपर्ण अभिजीत जोशी याने राज्यातून मिळविलेला प्रथम क्रमांक हा बुलडाणा जिल्हयाकरीता गौरवाची बाब असून सदरच्या यशाकरीता त्याने अभ्यासात सातत्य, शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना व्दिवेदी , गुरुजनवर्ग तसेच आई वडीलांचे मार्गदर्शन मिळाल्यामुळेत्याने हे यश प्राप्त केले आहे. तसेच डिझायर कोचींग क्लासेसचे संचालक विवेक दांडगे (आय.आय.टी.) यांचेही मार्गदर्शन, मोलाचे ठरले आहे. सुपर्णच्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Protected Content