Home राजकीय …तर ठाकरे आणि राऊत नागीण डान्सही करतील – निलेश राणे

…तर ठाकरे आणि राऊत नागीण डान्सही करतील – निलेश राणे

0
102

thakare and raut

मुंबई, वृत्त्संस्था | भाजपाचे नेते निलेश राणे यांनी ट्विटवरुन शिवसेनेवर टीका केली आहे. ही टीका करताना निलेश यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख केला आहे.

 

सोमवारी ग्रँड हयातमध्ये झालेल्या कार्यक्रमावर निलेश यांनी टीका करताना उद्धव ठाकरे आणि संजय राऊत नागीण डान्स करायलाही तयार होतील असा टोला लगावला आहे. “काँग्रेसवाले आजच्या तारखेत उद्धवला आणि संज्याला नागीण डान्स करायला सांगितले तरी ते दोघ करणार,” असे निलेश ट्विटमध्ये म्हणाले आहेत.
तसेच पुढे ते लिहितात, “एका गोष्टीच वाईट वाटले शिवसैनिकांना ओळख परेड करुन आरोपी सारखे दोन हॉटेल बदलून आणले गेले आणि काँग्रेसवाल्यांनी शपथ घ्यायला लावली.”

निलेश यांच्याआधी कालच रात्री पत्रकार परिषद घेऊन भाजापाचे प्रवक्ते आशिष शेलार यांनी या बैठकीवरुन शिवसेनेवर टीका केली होती. “आज बाळासाहेब ठाकरेंचे नातू आदित्य ठाकरे यांनी सोनिया गांधी यांचे नेतृत्त्व स्वीकारले. यापेक्षा मोठा अपमान काय असू शकतो? शिवसेनेचे बेगडी हिंदुत्त्व आहे,” असा टोला शेलार यांनी लगावला. “देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्त्वात स्थापन झालेले सरकार आपले संख्याबळ सिद्ध करेल. पाच वर्षे दलित, पीडित आणि दुर्बल घटकांसाठीचे काम करणार,” असेही शेलार यांनी यावेळी म्हटले आहे.


Protected Content

Play sound