राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून वस्तू वाटप

 

जळगाव, प्रतिनिधी | लॉकडाऊनमुळे बेरोजगार झालेल्या हातमजूर, गरजू, कष्टकरी चर्मकार बांधवांना सामाजिक आधार मिळण्यासाठी १० मे रोजी राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे ५० गरजू कुटुंबीयांना जीवनावश्यक अन्नधान्य व सुरक्षित मास्कचे मोफत वाटप करण्यात आले.

राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे फिजिकल डिस्टन्सिंग ठेवत प्रत्येकाला मास्क वाटप करण्यात आले. तसेच या वेळी ५० कुटुंबीयांना प्रत्येक ४ किलो गहू, २ किलो तांदूळ, १ किलो साखर, १ किलो मीठ, तूरडाळ, खाद्यतेल पाऊच, मिरची, चहा पावडर या किटचे वाटप करण्यात आले. तर दीपक अहिरे यांच्याकडून १०० मास्कचे वाटप करण्यात आले. जीवनावश्यक किट आणि मास्कचे वाटप राष्ट्रीय चर्मकार संघाचे कार्याध्यक्ष भानुदास विसावे, जिल्हाध्यक्ष उत्तमराव मोरे, जयश्रीताई विसावे, सुनील विसावे, संजय वानखेडे, कैलास वाघ, भगवान बाविस्कर, पुरुषोत्तम चिमनकर, गिरीश भोसले, मंगला सोनवणे, भारती बाविस्कर, दीपक अहिरे, किशोर धोरे, दीपक मेथे, साहेबराव खजुरे, अविनाश वानखेडे, ज्ञानेश्वर बाविस्कर, आर. डी. विसावे, डॉ. विजय सोनवणे, डॉ. लीलाधर बोरसे, तुकाराम विसावे, समाधान मेथे, प्रल्हाद विसावे, पुरुषोत्तम चिमणकर, गिरीश भोसले आदींच्या सामाजिक बांधिलकीतून व सहकार्यातून करण्यात आले. गरजूंना अन्नधान्य व मास्क वाटपप्रसंगी भानुदास विसावे, दीपक अहिरे, उत्तमराव मोरे, जयश्रीताई विसावे, सुनील विसावे, संजय वानखेडे, कैलास वाघ, भगवान बाविस्कर, पुरुषोत्तम चिमनकर, गिरीश भोसले आदी उपस्थित होते.

Protected Content