यावल, प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २१ व्या वर्धापन दिवसानिमित्ताने तालुक्यातील शिरसाड व साकळी या दोन्ही गावांत कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांना रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी होमीयोपॅथीक आसेर्निक एल्बम ३०चे मोफत वाटप करण्यात आले.
शिरसाड व साकळी गावातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते नरेन्द्र पाटील व निर्मल पाटील या पदाधिकाऱ्यांनी गावात घरोघरी जावुन आसेर्निक एल्बम ३० या औषधीचे वाटप केले. ग्रामस्थांना कोरोना संसर्गाच्या विषाणूपासून कशा प्रकारे सावध व सुरक्षीत राहावे या विषयी माहीती देणारे पत्रके वाटुन मार्गदर्शन केले. राष्ट्रवादी पक्षाच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम हा एका सामाजिक उपक्रमातुन लोक उपयोगी कार्यक्रमाव्दारे साजरा करण्यात आल्या बद्दल ग्रामस्थांनी पक्षाच्या कार्यक्रत्यांचे कौतुक करून आभार मानले. यशस्वीतेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे यावल तालुका अध्यक्ष प्रा. मुकेश येवले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस विजय प्रेमचंद पाटील, राष्ट्रवादी युवकचे तालुका अध्यक्ष अॅड. देवकांत पाटील, राष्ट्रवादी ओ.बी.सी. सेलचे निवृत्ती धांडे , नाना बोदडे, अरूण लोखंडे , कामराज घारू, अय्युब खान सर आदींचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.