राष्ट्रवादीला एमआयएमच्या ऑफर नंतर आता केवळ इसीसकडून प्रस्ताव बाकी – आ. निलेश राणेचे ट्वीट

मुबई – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा  । राज्यात गेल्या अडीच वर्षापासून महाविकास आघाडीचं सरकार असून या सरकारवर भाजपाकडून चोहोबाजूने टीका करीत सरकार स्थापन करण्याचे किंवा पाडण्याचे मुहूर्त वारंवार सांगितले जात आहेत. या पार्श्वभूमीवर एमआयएमने राष्ट्रवादी काँग्रेसला ऑफर दिली आहे. त्यामुळे राज्यात नव्या सत्तासमीकरणाची नांदी सुरू झाली असल्याची चर्चा असून यावर आता केवळ इसीसकडून प्रस्ताव येण्याचे बाकी असल्याचा टोला भाजपा आ. निलेश राणेंनी ट्वीटरवरून लगावला आहे.

 

भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे, अशी भूमिका शरद पवार आणि गेल्यावर्षी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेल्या ममता बॅनर्जी यांनी त्यावेळी मांडली होती. याचा आधार घेत एमआयएमने राष्ट्रवादी युतीची ऑफर दिली आहे. याला कारणही तसेच आहे. नुकत्याच पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या आहेत. गोव्यासह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपानं विजय मिळवल्यानंतर राज्यात देखील आत्तापासूनच निवडणुकांचे वारे वाहायला लागले आहेत. देवेंद्र फडणवीसांनी एकीकडे २०२४मध्ये स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचा निर्धार व्यक्त केला असतानाच एक खासदार, २९ नगरसेवक, दोन आमदार असलेल्या एमआयएमची राष्ट्रवादीला असलेली ऑफर सध्या चर्चेत आली असून एमआयएमनं महाविकास आघाडी आणि विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसला युतीची ऑफर दिली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क आणि प्रतिक्रिया उमटू लागल्या असताना भाजपा आमदार नितेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून महाविकास आघाडीला खोचक टोला लगावला आहे.

“एमआयएमवर नेहमीच आरोप करण्यात येतात की भाजपा आमच्यामुळे जिंकते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भेटायला आले असता एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिली असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रवादी आमच्यासोबत युती करायला तयार आहेत का? त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते काही बोलले नाहीत. त्यांना फक्त आरोप करायचे आहेत की त्यांना त्यांची भूमिका सिद्ध करायची आहे. हे पहायचे आहे”, असं इम्तियाज जलील यांनी व्यक्त केले.
या भूमिकेवर “खरंच करून दाखवलं…!”असे म्हणत भाजपचे आ. नितेश राणेंनी ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला असून आता एमआयएमला देखील मविआत येण्याची तयारी आहे. कट्टरपंथींना देखील शिवसेना जवळची वाटत असून आता केवळ इसीसचाच प्रस्ताव यायचा बाकी आहे.’ असं नितेश राणे यांनी ट्वीटरद्वारे म्हटले आहे.

Protected Content