जळगाव राहूल शिरसाळे । राष्ट्रवादी महिला काँग्रेस व डॉक्टर सेल यांच्या संयुक्त विद्यमाने आज ‘वाण आरोग्याचं’ या मोफत महिला आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, महिला जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
‘वाण आरोग्याचं’ मोफत महिला आरोग्य तपासणी शिबिरात एम. डी. मेडिसिन डॉ. मनोहर पंडित, नेत्र तज्ज्ञ डॉ. वृषाली पाटील, डॉ. अशोक पाटील, डॉ. आर. एस. पाटील तज्ज्ञ डॉक्टर्स यांनी तपासणी केली. याशिबिरात मोफत नेत्र चिकित्सा, मधुमेह, रक्तदाब तपासणी आदींचा समावेश होता. याप्रसंगी राष्ट्रवादी महिला नंदूरबार निरीक्षक मीनाक्षी चव्हाण, राष्ट्रवादी महिला महानगर सरचिटणीस ममता तडवी, माजी नगरसेविका लता मोरे, राष्ट्रवादी महिला महानगर सरचिटणीस कमला पाटील, अर्चना कदम, शकुताई, जयश्री पाटील, आशा आंभोरे, डॉ. सुषमा चौधरी, शोभा भोईटे, रईसा पटेल, उत्तर महाराष्ट्र राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या दिव्या भोसले, राष्ट्रवादी शेतकरी संघटनेच्या लता पाटील आदी उपस्थित होते. गरजूंना मोफत औषधे देण्यात आले. रुग्णांनी मोठ्या संख्येने तपासणी शिबिराचा लाभ घेतला. सूत्रसंचालन व आभार जयश्री पाटील यांनी मानले.
Link Part 1 : https://www.facebook.com/508992935887325/videos/476951143662522
Link Part 2 : https://www.facebook.com/508992935887325/videos/2808878032686604